<p>अहिल्यानगर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले, आमदार संग्राम जगताप तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. </p><p>मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवाजीराव कर्डिले यांनी संपूर्ण आयुष्य शेवटच्या घटकातील व्यक्तीकरिता एक संघर्ष योद्धा म्हणून काम केले. अत्यंत कठीण काळात देखील त्यांनी शेवटच्या माणसाचे काम मार्गी लावले आहे. एक धाडसी व्यक्ती कसा असावा ते शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा असावा असे त्यांचे कार्य शेवटपर्यंत राहिले आहे.</p><p>दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या शेवटच्या स्वप्नाबाबत सांगत असताना शिवाजीराव यांच्या जीवनातील असलेले स्वप्न माझ्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. </p>