<p>बीड : साताऱ्यातील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची डॉ. अनंत मुळे यांनी भेट घेतली. त्यांनी भेट घेतल्यानंतर सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला जाणार असल्याची माहिती दिली. असोसिएशनच्या रेसिडंट डॉक्टरांकडून शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण राज्यभरात बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद ठेवला जाणार आहे. बाह्यरूग्ण विभाग बंद ठेवल्यानंतरही शासनानं दखल न घेतल्यास पूर्ण सेवा बंद केली जाणार असल्याची माहितीदेखील यावेळी असोसिएशनकडून देण्यात आली आहे. तसेच डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर, 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत शासकीय आणि खासगी सर्व डॉक्टरांच्या सेवा बंद ठेवल्या जाणार असल्याचं डॉ. अनंत मुळे यांनी सांगितलं.<br> </p>
