Surprise Me!

'मुंडे बहीण भाऊ दाखवतात वेगळं मात्र, ते दोघं कायम एकत्रच'; खासदार बजरंग सोनवणे

2025-11-23 0 Dailymotion

<p>बीड : मुंडे बहीण भाऊ हे कायम एकत्रच आहेत. परंतु ते दाखवतात मात्र वेगवेगळं. यामुळं कार्यकर्त्यांची अडचण होते. निवडणुकीपूर्वी आमच्या उमेदवारांना कोणाकोणाचे फोन आले याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. ते योग्यवेळी समोर आणणार आहे असं, देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. परळी नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं उमेदवार दिलेला असून या ठिकाणी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुती करण्यात आली. या महायुतीचे नगरसेवक पदाचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून खासदार बजरंग सोनवणे यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.</p>

Buy Now on CodeCanyon