Surprise Me!

घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठणातून शेकडो भक्तांचा दत्तचरणी मंत्रघोष; भारतासह विविध देशात एकत्रित पठण

2025-11-24 1 Dailymotion

<p>पुणे : गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने आणि नर्मदे हर हरच्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे सामुदायिक पठण पुणे आणि जिल्ह्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी दत्तचरणी हजारो भाविक मनोभावे नतमस्तक झाले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोरील उत्सव मंडपात १२८ व्या दत्त जयंती उत्सवाच्या शुभारंभानिमित्तानं करण्यात आलं होतं. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख चिदानंद अवधूत बाबा महाराज तराणेकर (इंदोर), जया तराणेकर, वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. नारायणरत्न शरदशास्त्री जोशी महाराज, आदी उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख बाबा महाराज तराणेकर (इंदोर) यांचा अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. </p>

Buy Now on CodeCanyon