<p>सातारा : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या स्मृतिदिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. वयोमानामुळं शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, वडिलांच्या अनुपस्थितीत खासदार सुप्रिया सुळे यांनी परंपरा जपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार नव्हते. अजित पवार यांना दौरा आला होता परंतु तोही निश्चित नव्हता. तर सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, कराडच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव, सातारच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील उपस्थित होत्या. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक विकासाचा पाया घातला. त्याचबरोबर शेती आणि उद्योग एकमेकांना पूरक राहतील, असे धोरण राबवले.</p>
