Surprise Me!

'नागरिकांच्या बहुमोल मतानं प्रथम नागरिक होण्याचा मान मला मिळणार'; अभिजीत बिचुकलेंनी व्यक्त केला विश्वास

2025-11-27 5 Dailymotion

<p>सातारा : सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या चिन्ह वाटपामध्ये त्यांनी नेहमीप्रमाणं यंदाही दूरदर्शन संच चिन्ह मिळालं आहे. "2004 सालापासून दूरदर्शन संच हे चिन्ह सर्व निवडणुकीमध्ये वापरत आहे. आता नागरिकांच्या बहुमोल मतानं प्रथम नागरिक होण्याचा मान मला मिळणार आहे. मी नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना माझ्याबाबत काय झालं? हे माझा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना पत्रकार परिषदेत सांगणार आहे.  सातारा शहरात अजून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी जर नगराध्यक्ष झालो तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो की ज्या शाळेत डॉक्टर आंबेडकर शिकले त्या शाळेला राष्ट्रीय स्मारक बनवणार," असं आश्वासन अभिजीत बिचकुले यांनी दिलं.</p>

Buy Now on CodeCanyon