Surprise Me!

दत्त जयंती निमित्तानं शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी; साईबाबा मंदिरासह परिसराला फुलांची सजावट

2025-12-04 3 Dailymotion

<p>शिर्डी (अहिल्यानगर)- देशभरात आज दत्तजन्म उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडत आहे. श्रीदत्तांचा अवतार मानण्यात येणाऱ्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आज पहाटेपासून साईमंदिरात भाविक मोठ्या संख्येनं झाले आहेत. <br>साई समाधी शाताब्दी मंडपात चांदीच्या पाळण्यात श्रीदत्त मूर्ति ठेवून दत्त जन्माचे किर्तन झाल्यानंतर जन्म उत्सव साजरा करण्यात आला. आज दिवसभर साई समाधीजवळ श्रीदत्त यांचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाणार आहे. द्वारकामाई येथे बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी पाहण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक आले आहेत.  बाबा हेच आमचे राम, रहिम, कृष्ण, दत्त आणि विठ्ठल असे म्हणत साईबाबा अनेक रूपात दर्शन देतात, अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. सकाळपासून साईबाबांना सुवर्ण अलंकारांनी मढवण्यात आलं.  साईंच्या रूपात दत्त स्वरूपाचं दर्शन होत असल्याचा भाविकांनी भावना व्यक्त केली. साई मंदिर परिसर, गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि समाधी मंदिर फुलांनी आकर्षकरीत्या सजवण्यात आलं आहे. ही सजावट देणगीदार साईभक्त रजनी डांग यांच्या देणगीतून साकारण्यात आली आहे. </p>

Buy Now on CodeCanyon