Surprise Me!

आकाशात आज दिसणार 'सुपर ब्लू मून'चं अप्रतिम दृश्य!

2025-12-04 2 Dailymotion

<p>ठाणे : आज गुरुवार, (4 डिसेंबर) रोजी श्री दत्तजयंतीच्या दिवशी (Datta Jayanti 2025) मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात रात्रभर सुपरमूनचं दर्शन होणार असल्याचं पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. याविषयी ते अधिक माहिती देताना म्हणाले, "चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार किमी अंतरावर असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या 3 लक्ष 56 हजार 962 किमी अंतरावर येणार आहे. त्यामुळं त्यारात्री चंद्रबिंब 14 टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसेल. संपूर्ण भारतातून साध्या डोळ्यांनी आपणास सुपरमूनचं दर्शन घेता येईल. गुरुवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी पूर्वेस सुपरमून उगवेल आणि रात्रभर आपणास दर्शन देऊन सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी पश्चिमेस मावळेल. यानंतर पुन्हा सुपरमून दर्शनाचा योग पुढच्या वर्षी 24 डिसेंबर 2026 रोजी येणार आहे."</p>

Buy Now on CodeCanyon