<p>पुणे: संकष्टी चतुर्थीनिमित्त (Sankashti Chaturthi) दगडूशेठ गणपती समोर विविध पालेभाज्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. २१ प्रकारच्या २००० भाज्यांचा या सजावटीत समावेश आहे. आज भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. आजच्या चतुर्थीपासून प्रत्येक चतुर्थीला ब्राह्म मुहूर्तावर एका गायक कलाकाराला गणपती बाप्पासमोर आपली कला सादर करण्याची संधी ट्रस्टर्फे देण्यात येणार आहे. याची सुरुवात आज कृपा किरण नाईक यांच्या गायनाने झाली. कृपा नाईक यांनी पहाटे तीन ते साडेचार या वेळात गणपती बाप्पासमोर आपली गायन सेवा सादर केली. यावेळी त्यांनी सादर केलेल्या भक्ती गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. अशा प्रकारे ब्राह्म मुहूर्तावर बाप्पासमोर गायन सेवा सादर करायला मिळणं हे भाग्यच असल्याचं कृपा नाईक यांनी म्हटलं. यावेळी अध्यात्मिक गुरु डॉ. सुनील काळे, ट्रस्चे अध्यक्ष सुनील रासने उपस्थित होते. </p>
