<p>बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांच्या कन्या आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. वडिलांच्या आठवणी सांगताना त्या काहीशा भावूक झाल्याचं दिसून आलं. पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांच्या आठवणी सांगताना, "आज मुंडे साहेब हवे होते. मुंडे साहेबांच्या खूप आठवणी आहेत," असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. "मुंडे साहेबांनी आम्हाला खूप आदर दिला." त्यांनी एक खास आठवण सांगितली, "माझ्या मुलाला जेंव्हा जन्म दिला, तेव्हा सर्व बाळाकडे (नातवाकडे) गेले; पण बाबा (मुंडे साहेब) माझ्याकडे येऊन माझी चौकशी केली." यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतःला मुंडे साहेबांची शिष्य मानले. त्या म्हणाल्या, "मी मुंडे साहेबाची मुलगी आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं मी शिष्य आहे." मुंडे साहेब हे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे नेते होते. शेवटी, त्यांनी मुंडे साहेबांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित करत, "मुंडे साहेबांची जयंती ही प्रत्येकाची आहे," अशी भावना व्यक्त केली.</p>
