Surprise Me!

नवले ब्रीज परिसरात 'महामृत्युंजय आंदोलन'; आंदोलक म्हणाले "कायमच्या उपाययोजना करा"

2025-12-12 1 Dailymotion

<p>पुणे : मागील काही वर्षांपासून पुण्यातील नवले ब्रीज इथं अपघातांचा सत्र सुरू आहे. मागच्या महिन्यात नवले ब्रीजवर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नवले ब्रीज इथं कायमच्या उपाययोजना कराव्यात ही मागणी होत आहे. नवले ब्रीज परिसरातील वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ आणि एलेवेटेड ब्रिज उभारण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी भूपेंद्र मोरे यांच्या वतीनं 'महामृत्युंजय आंदोलन' करण्यात आलं. पुण्यातील नवले ब्रीजवरील अपघातप्रवण स्पॉटवर आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हातात बेड्या घालून तीव्र आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक भूपेंद्र मोरे म्हणाले, "गेल्या अनेक वर्षापासून नवले ब्रीज परिसरात मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. इथं कायमच्या उपाययोजना कराव्या ही आमची मागणी असून इथं एलिव्हेटेड ब्रीजची तातडीची गरज आहे."  </p>

Buy Now on CodeCanyon