Surprise Me!

नगरपालिका निकालानंतर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट; निकालानंतर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

2025-12-21 28 Dailymotion

<p>रायगड : राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकींचा निकाल (local Body Election Result 2025) आज जाहीर झाला आहे. या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यामुळं, सकाळपासूनच भाजपाने विजयाचा जल्लोष साजरा केला. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे (Sunil  Tatkare) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निकालांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी रायगडमधील मतदारांचे आभार मानत, जनतेने दिलेला कौल स्वीकारल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यश मिळालं तर काही ठिकाणी आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.</p>

Buy Now on CodeCanyon