Surprise Me!

मंगेश काळोखे हत्या प्रकरण; उर्वरित आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करणार, महेंद्र थोरवे यांचा इशारा

2026-01-07 51 Dailymotion

<p>रायगड : खोपोलीतील शिवसेनेचे पदाधिकारी मंगेश काळोखे (Mangesh Kalokhe) यांच्या हत्या प्रकरणाला आज तेरा दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. "मंगेश काळोखे यांची हत्या ही सुपारी देऊनच करण्यात आली असून हा संपूर्ण प्लॅनिंग मर्डर आहे", असा गंभीर आरोप आमदार थोरवे यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला असला तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडं सबळ पुरावे असून सुद्धा अटक केली जात नसल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे. या दोघांचा हत्येत मोठा सहभाग असल्याचं थोरवे यांनी सांगितलं. </p>

Buy Now on CodeCanyon