Surprise Me!

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त महापंगत, दीड लाख भाविकांनी घेतला एकाचवेळी महाप्रसाद, पाहा व्हिडिओ

2026-01-10 66 Dailymotion

<p>बुलढाणा - जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी शुकदास महाराज यांचा विवेकानंद आश्रम असून, येथे स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सतत 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यामध्ये कीर्तन, हरिपाठ, व्याख्यान, शेतकरी मार्गदर्शन, साहित्य संमेलन आदी प्रकारचे कार्यक्रम होतात. शेवटच्या दिवशी येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप आश्रमाकडून करण्यात येतं. महाप्रसादाची तयारी सतत 2 दिवस चालते, तर जवळपास 40 एकर शेतामध्ये दोन्ही बाजूनी शिस्तबद्ध बसून पुरी -भाजीचा महाप्रसाद जवळपास लाखोंच्या वर भाविक भक्तांनी घेतला आहे.</p><p>101 क्विंटल गहूची पुरी, 101 क्विंटल वांगीची भाजी, 100 ट्रक्टर, 3 हजार स्वयंसेवक यामध्ये सहभागी होतात. हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद जन्मोत्सवासाठी राज्यभरातून भाविक भक्त आश्रमात येत असतात.</p>

Buy Now on CodeCanyon