<p>मुंबई- मुंबई वॉर्ड क्रमांक 169 कुर्ला पूर्व इथून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यानिमित्तानं कुडाळकर कुटुंबीयांनी एकत्रित मतदानाचा अधिकार बजावला. सोबत सर्व सामान्य मतदारांच्या काय अपेक्षा आहेत? याचासुद्धा ईटीव्ही भारतानं आढावा घेतलाय. आम्हाला स्वच्छ आणि सुंदर मुंबई पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केलीय. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ही पहिलीच महापालिका निवडणूक होत आहे. त्यामुळे महापालिका जिंकून शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकवायचाय, असा मानस यावेळी आमदार मंगेश कुडाळकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. सकाळपासून मतदानाच्या केंद्रावर मतांसाठी नागरिकांची फारशी गर्दी पाहायला मिळत नसली तरी दुपारनंतर ही गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. </p>
