Surprise Me!

एक तासाच्या गोंधळानंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक अन् परिवारानं केलं मतदान, नेमकं प्रकरण काय?

2026-01-15 4 Dailymotion

<p>नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे आणि या दरम्यान एक घटना समोर आलीय. महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक यांना मतदान करण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. गणेश नाईक यांनी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या गोंधळावरून गंभीर आरोप केलेत. यंत्रणा टू दी पॉइंट काम करीत नसल्याचा गणेश नाईक यांचा आरोप आहे.  वनमंत्री गणेश नाईक आणि परिवार यांच्या परिवाराच्या मतदानाचा घोळ सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होता. दोन मतदान केंद्रावर फिरूनही गणेश नाईक आणि परिवाराचे नाव मिळत नव्हते. हा घोळ एक तास सुरू होता. अखेर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक, सून कल्पना नाईक यांचे नाव मिळाले. मात्र पुतणे माजी महापौर सागर नाईक आणि त्यांची पत्नी यांचे नाव परिवारासह न येता वेगळ्या ठिकाणी आल्याचे दिसून आले. यामुळे नेहमी एकाच मतदान केंद्रावर मतदान करणारे संपूर्ण नाईक परिवार यावेळी मात्र निवडणूक आयोगाच्या घोळामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करताना पाहायला मिळाले. </p>

Buy Now on CodeCanyon