Surprise Me!

लिक्विडने मतदानाची शाही पुसल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप, रुपाली चाकणकर यांनी भाजपा उमेदवाराला विचारला जाब

2026-01-15 6 Dailymotion

<p>पुणे : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. पुणे महापालिकेच्या जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. असं असताना पुण्यातील धायरी येथील प्रभाग 34 येथील शाळा नारायणराव सणस विद्यालय येथे मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप देत पोलिसांकडं तक्रार केली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 34 मध्ये अनेक महिला आणि मुलं बोगस मतदान करून बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडं तक्रार नोंदवली आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना सोबत घेऊन भाजपा उमेदवाराच्या बुथवर जाऊन या लिक्विड संदर्भात जाब विचारला आहे.</p>

Buy Now on CodeCanyon