<p>नांदेड : महानगरपालिका निवडणुकीसाठी 20 प्रभागातून 81 जागांसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नांदेडमध्ये भाजपानं स्वतंत्र निवडणूक लढवत 67 जागांवर उमेदवार उभे केलेत. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता बैतुल उलूम शाळा येथील मतदान केंद्रावर खासदार अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण आणि माजी आमदार अमर राजूरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. "लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करावं तसंच आजपर्यंत शहराचा विकास कुणी केला आणि विकास कोण करु शकतो? हे पाहूनच मतदान करावं. बदललेले प्रभाग, मतदार यादीत नावं नसल्यानं अनेकांच्या तक्रारी आहेत. याबाबत माझ्यापर्यंतही तक्रारी आल्या आहेत. माझी प्रशासन व निर्वाचन अधिकाऱ्यांना सूचना आहे की त्यांनी तातडीनं याची दखल घेत मतदारांच्या तक्रारींचं निरसन करावं," असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले. </p>
