<p>मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता येणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिवसेना भवनच्या आसपासच्या परिसरात शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार मिलिंद वैद्य आणि निशिकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. वॉर्ड नंबर 182 इथून शिवसेना (उबाठा) पक्षाचे मिलिंद वैद्य विजयी झालेत. मिलिंद वैद्य यांच्या विजयानंतर शिवसैनिक आणि मनसैनिक यांनी शिवसेना भवन इंथ विजयी जल्लोष केला. तसंच या विजयानंतर प्रतिक्रिया देताना आमदार महेश सावंत यांनी म्हटलं आहे की, "आज थोडासा मनाला आराम मिळाला आहे. गेले काही दिवस आम्ही प्रचंड धावपळ करून आमच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत होतो. आता माहीमचा विकास जोरात होणार, असं महेश सावंत यांनी म्हटलं आहे.</p>
