<p>जालना : धनगर समाज आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील अंबड शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी संचार बंदी लागू केली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे शनिवारी जालन्यातून धनगर समाजाच्या आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानाकडं रवाना होणार आहेत. आझाद मैदान इथं पोलिसांनी बोऱ्हाडे यांना आंदोलन करण्यास मनाई केलेली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जालना आणि अंबड शहरात संचारबंदी लागू केली आहे. "पोलिसांना सहकार्य करूनही पोलीस धनगर समाज आरक्षण आंदोलकांची धरपकड करत आहेत. त्यांनी हजारो आंदोलकांना नोटीस बजावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द पाळावा. फडणवीस सरकार इंग्रजांपेक्षा जास्त दादागिरी करत आहे," असा आरोप आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी केला. </p>
