Surprise Me!

पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली अजित पवारांची भेट, सांगितली पराभवाची कारणं

2026-01-19 2 Dailymotion

<p>पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपानं एकहाती सत्ता आणली असून, तब्बल ११९ नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. दुसरीकडे आक्रमक प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २७ नगरसेवक निवडून आले, तर पक्षाचे अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला, तर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत पराभवाची कारणे जाणून घेतली.</p><p>पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता  महायुतीत असताना देखील भाजपावर जोरदार टीका करत पुण्यातील कारभारी बदला अशी घोषणाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली होती  मात्र, असं असलं तरी महापालिकेच्या या निवडणुकीत पक्षाला हवं तसं यश मिळालं नसून, अनेक दिग्गजांचा पराभव या निवडणुकीत झाला.</p>

Buy Now on CodeCanyon