Surprise Me!

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचाराचा धडाका, मंत्री भरत गोगावले यांनी नॅपकिन फिरवत विरोधकांना दिला इशारा

2026-01-20 7 Dailymotion

<p>रायगड - जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेकडून महाड आणि पोलादपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. महाड शहरात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.</p><p>महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. जोरदार घोषणाबाजी, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात ही विराट रॅली शहरातून काढण्यात आली. या रॅलीत महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.</p><p>यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त करत, “आपण एकजुटीने काम केलं तर ही निवडणूकही निश्चित जिंकू,” असा दावा केला. याचवेळी त्यांनी आपल्या शैलीत नॅपकिन फिरवत विरोधकांना थेट इशाराही दिला.</p>

Buy Now on CodeCanyon