Surprise Me!

गणेश जयंती 2026; विराज जोशींनी केली दगडूशेठ हलवाई गणपती चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण

2026-01-21 3 Dailymotion

<p>पुणे (Ganesh Jayanti 2026) : यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गुरुवारी (22 जानेवारी) दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आज पहाटे 4 ते 6 यावेळेत मंदिरात पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी बाप्पाच्या चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. यावेळी भक्तांना स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी मिळाली आहे. गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा गुरुवारी दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती, कार्याध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली. तसंच गणेश जन्माच्यावेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. भाविकांनी विविध कार्यक्रमात सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा, असं ट्रस्टतर्फे कळवण्यात आलं आहे.</p>

Buy Now on CodeCanyon