<p>पुणे : महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा प्रशासन व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बजाज पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा’ ही भारतातील पहिली UCI Class 2.2 आंतरराष्ट्रीय मल्टीस्टेज सायकलिंग स्पर्धा १९ ते २३ जानेवारी या कालावधीत पुणे जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडली. ही स्पर्धा पुणे शहर तसेच ग्रामीण भागात मिळून चार टप्प्यात पार पडली. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून ३५ देशातील १७० हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. 'भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा पुणेकरांकडून देत परदेशी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात होतं. </p><p>सायकलिंगचं शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराला पुन्हा एकदा या स्पर्धेने सायकलिंगचे शहर म्हणून ओळख दिली, तर या स्पर्धेतून नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं याबाबत सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी मणिन्दर पाल सिंग यांच्याशी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी खास बातचीत केली.</p>
