Surprise Me!

मुंबई–गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालणार; अडीच तास अडकल्यानंतर आ प्रवीण दरेकर यांची ग्वाही, म्हणाले 'ज्याचं जळतं त्यालाच कळतं'

2026-01-24 10 Dailymotion

<p>रायगड - लागोपाठ तीन दिवस सुट्टी असल्यामुळे मुंबई–गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडीचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनाही बसला. रायगड जिल्ह्यातील इंदापूर परिसरात मुंबई–गोवा महामार्गावर आ प्रवीण दरेकर तब्बल अडीच तास वाहतूक कोंडीत अडकले होते. दररोज या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो, तो आज प्रत्यक्ष अनुभवला, अशी प्रांजळ कबुली दरेकर यांनी दिली. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस करून महामार्गावरील परिस्थितीची माहिती दिल्याचं सांगितलं. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही या संदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असून, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकार स्तरावर ठोस पावलं उचलली जातील, असं आश्वासनही प्रवीण दरेकर यांनी दिलं. दरम्यान, या महामार्गावरील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांसह पर्यटक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर उपाययोजना करण्याचा दबाव वाढताना दिसत आहे.</p>

Buy Now on CodeCanyon