Surprise Me!

सुट्टीच्या दिवशी 'विचका'; पुणे-मुंबई महामार्गावर तब्बल ८ ते १० किलोमीटर वाहतूक कोंडी

2026-01-25 1 Dailymotion

<p>पुणे : शनिवारीनंतर सलग दोन दिवस सुट्ट्यामुळे अनेकजण सकाळीच घराबाहेर बाहेर फिरण्यासाठी चारचाकीनं निघाले. त्यामुळे आज रविवारी सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबई हायवेवर सकाळपासून तब्बल ८ ते १० किमी लांबपर्यंत चारचाकींची लाईन लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून २० २० मिनिटांचे ब्लॉक घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोणावळापासून ते खालापूर टोल नाक्यापासून वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहे. सकाळपासून पुणे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे टॉमटॉम संस्थेच्या अभ्यासानुसार पुण्याचा वाहतूक कोंडीत जगभरात पाचवा क्रमांक लागतो. पुण्यातील वाहनचालकांना दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल ३३ मिनिटं २० सेकंदांचा कालावधी लागतो.</p>

Buy Now on CodeCanyon