कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFO ने नव्या वर्षात आपल्या सुमारे 8 कोटी सदस्यांना मोठी भेट दिली आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या, ऑनलाईन अर्ज, क्लिष्ट फॉर्म आणि अनेक दिवसांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. काही मिनिटांतच युपीआयच्या माध्यमातून थेट पीएफचे पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत. ही सुविधा अगदी लवकरच सुरू होणार असून, BHIM UPI ॲपच्या माध्यमातून सदस्यांना हा लाभ मिळणार आहे.
