<p>अहिल्यानगर- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झालंय. बुधवारी सकाळी 8.45 वाजता बारामती विमानतळावर उतरताना त्यांचे चार्टर्ड विमान कोसळले. ते 66 वर्षांचे होते. या अपघातात अजित पवारांचे सुरक्षारक्षक, दोन वैमानिक आणि एका महिला क्रू मेंबरसह पाच जणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. ते सकाळी 8:10 वाजता मुंबईहून निघाले. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, वैमानिकाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने त्याने विमान अधिक उंचीवर नेले. अजित पवारांच्या निधनानंतर खासदार निलेश लंकेंना अश्रू अनावर झालेत. मला बोलून तिकीट देऊन आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच केल्याची आठवणही निलेश लंकेंनी सांगितलंय. </p>
