Surprise Me!

जेव्हा बिनविषारी साप दुचाकीमध्ये घुसतो तेव्हा...

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक : वेळ संध्याकाळी साडे सात वाजेची. ठिकाण पंडीत कॉलनी, मनपा विभागीय कार्यालय. साधारण दोन ते अडीच फूट लांबीचा साप रस्त्यावरून सरपटत येत एका दुचाकीच्या सिटखाली शिरतो...बघ्यांची गर्दी जमते... अनेक जण दुचाकीभोवती सापाचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. याचवेळी इको-एको फाऊण्डेशन या पर्यावरण व वन्यजीव प्रेमी संस्थेचा सदस्य वैभव भोगले याला बोलविले जाते...अन् दुचाकीच्या सिटखाली शिरलेल्या तस्कर जातीच्या सुमारे तीन फूट लांबीच्या सापाला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात येते. या घटनेनंतर बघ्यांच्या गर्दीसह दुचाकीमालकाने सुटकेचा निश्वास सोडल्याचे पाहावयास मिळाले. (व्हिडिओ - अझहर शेख)

Buy Now on CodeCanyon